Solar Eclipse Match : सामन्यादरम्यान अचानक आकाशात घडली अद्भूत घटना! क्रिकेट सोडून स्टेडियममधील प्रेक्षक पाहू लागले सूर्यग्रहण
Solar Eclipse Match : ब्रिटनमधील या सामन्यादरम्यान घडलेल्या या अनोख्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर प्रचंड व्हायरल होत आहे.

Solar Eclipse During The Hundred 2026 MI London vs Birmingham Phoenix Match : लाईव्ह क्रिकेट सामना सुरू असताना जर आकाशात अचानक सूर्यग्रहण सुरू झाले, तर मैदानातील सर्वांचेच लक्ष खेळावरून हटून आकाशाकडे जाणे साहजिक आहे. असाच एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्भूत नजारा बुधवारी ‘द हंड्रेड’ (The Hundred) लीगच्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. भारतीय वेळेनुसार बुधवारी उशिरा संध्याकाळी जगभरातील अनेक भागांत सूर्यग्रहण दिसले. ब्रिटनमधील या सामन्यादरम्यान घडलेल्या या अनोख्या घटनेचा व्हिडीओ ‘स्काई स्पोर्ट्स’ने (Sky Sports) सोशल मीडियावर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
६० चेंडूंचा खेळ पूर्ण होताच सूर्यग्रहण!
बुधवारी ‘एमआय लंडन’ (MI London) आणि ‘बर्मिंघम फिनिक्स’ (Birmingham Phoenix) यांच्यात द हंड्रेडचा सामना सुरू होता. १०० चेंडूंच्या या खेळातील पहिल्या डावातील ६० चेंडू पूर्ण झाले असतानाच अचानक आकाशात अनोखा नजारा दिसू लागला. काही वेळापूर्वीच तळपणारा सूर्य हळूहळू चंद्राच्या अर्धकोरसारखा दिसू लागला. उघड्या डोळ्यांनी पाहता न येणारा सूर्य चंद्रासारखा रूप बदलताना पाहून सर्वजण थक्क झाले.
सामना थांबला, प्रेक्षकांनी लावले विशेष चष्मे!
The eclipse stealing the show at Edgbaston! 🌒🏏 pic.twitter.com/vnzovGaVDx
— Sky Sports (@SkySports) August 12, 2026
Eclipse fever has hit Edgbaston! 🌒 pic.twitter.com/HfEYTu6sp9
— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 12, 2026
सूर्यग्रहण सुरू होताच सुरक्षेचा उपाय म्हणून सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडू विशेष चष्मे (Eclipse Glasses) लावून आकाशातील या खगोलीय घटनेचे साक्षीदार बनले. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतरही बराच वेळ प्रेक्षकांचे लक्ष मैदानातील खेळापेक्षा आकाशातील सूर्यग्रहणावरच केंद्रित होते.
एमआय लंडनचा २ धावांनी रोमांचक विजय!
या ऐतिहासिक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमआय लंडनने १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बर्मिंघम फिनिक्सचा संघ ७ बाद १५५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे एमआय लंडनने अवघ्या २ धावांनी रोमांचक विजय मिळवला. सामना रंगतदार झाला असला तरीही या संपूर्ण लढतीत खरी चर्चा मात्र क्रिकेटदरम्यान झालेल्या सूर्यग्रहणाचीच रंगली.





