Solapur News : धक्कादायक ! विहिरीचा कठडा कोसळून 4 मजूरांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यात (Solapur News) पंढरपूर तालुक्यामध्ये आंबे गावातील एका शेतात विहिरीचे मोजमापाचे काम सुरू असताना अचानक ढिगारा कोसळून 4 मजूरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात (Solapur News) पंढरपूर तालुक्यामध्ये आंबे गावातील एका शेतात विहिरीचे मोजमापाचे काम सुरू असताना अचानक ढिगारा कोसळून 4 मजूरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात (Solapur News) एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या चौघा मजुरांच्या कुटुंबावर काळाने मोठा आघात केला आहे.
आबा घोडके, तानाजी घोडके, सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे अशी मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावात निवास शिंदे या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते.
हे काम जवळपास पूर्ण झाला होते. पण, 50 फुट विहिरीच्या आतमध्ये 4 मजूर हे मोजमाप घेण्यासाठी सकाळी 10 च्या सुमारास उतरले होते. पण, यावेळी अचानक विहिरीचा कठडा कोसळला आणि विहिरीत काम करत असलेले सर्व मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने प्रशासन (Solapur News) घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरु केले. ही भीषण दुर्घटना समजताच आंबे गावातील ग्रामस्थांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनीदेखील या बचावकार्यात मदत करण्यास सुरुवात केली. विहिरीत मोठ्या प्रमाणावर माती कोसळल्यामुळे मजुरांना सुखरूप बाहेर काढताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.






