Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; इर्टिगा-कंटेनरची जोरदार धडक; ८ वर्षांच्या चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू
Accident News : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी ते शेटफळ दरम्यान शेटफळ गावच्या हद्दीत एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला आहे.

Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावच्या हद्दीत इर्टिगा कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आठ वर्षांच्या चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तेलंगवाडी ते शेटफळ दरम्यान ही घटना घडली. (Accident News)
आठ वर्षांच्या पार्थसह तिघांचा मृत्यू
या अपघातात पार्थ तुषार भारंबे (वय ८), विलास चांगू भारंबे (वय ६६) आणि शोभा विलास भारंबे (वय ६३, तिघेही रा. कल्याण) यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Accident News)
इर्टिगा आणि कंटेनरची जोरदार धडक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इर्टिगा कार सोलापूर-पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना शेटफळ गावच्या हद्दीत कार आणि कंटेनर यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, तिघांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील अन्य दोघे जखमी झाले. (Accident News)
जखमी रुग्णालयात; वाहतुकीवर परिणाम
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलीस तपास करत आहे. (Accident News)





