‘छोरी 2’मधील सोहा अली खानचा भयावह अवतार

Chhori 2 | बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या ‘छोरी 2’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. यातील भयावह लुक पाहून तिला ओळखणेही कठीण झाले आहे. सोहाने सिनेमाच्या सेटवरचे मेकअप करतानाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सोहा अली खान पूर्णपणे ‘दासी माँ’च्या गेटअपमध्ये दिसत आहे.
छोरी २ सिनेमात सोहानं दासी ही भूमिका साकारली आहे. सिनेमात तिची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. या चित्रपटातील लुकमध्ये तिचा भूतासारखा चेहरा, पांढरे डोळे आणि विस्कटलेले केस हे तिच्या नेहमीच्या एलिगंट लुकपासून पूर्णतः वेगळे आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सोहाने तिच्या पोस्टला “On and off set with Daasi” असे कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये ती सेटवरच्या गंभीर लुकमध्ये दिसत आहे. तिच्या या लुकचे सोशल मीडियावर देखील मोठे कौतुक केले जात आहे.
‘छोरी 2’ हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छोरी’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत असून, सोहा अली खान या चित्रपटात अँटॅगोनिस्टच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. चित्रपटात अंधश्रद्धा, लोककथा आणि लिंगभेद यांसारख्या सामाजिक विषयांवर आधारित आहे.
हेही वाचा:
सामाजिक न्याय खाते बंदचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; अजित पवारांचा संजय शिरसाटांना टोला





