Soha Ali Khan post : बॅालीवूड अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने सोहाने एक खास पोस्ट इंन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने कुणालसोबतच्या काही सुंदर आठवणी शेअर केल्या आहेत. सोहा अली खान आणि कुणाल खेमू इंडस्ट्रीमधील सुंदर कपल म्हणून ओळखले जातात. आज २५ जानेवारीला त्यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘मला नेहमीच माहित होते की तू वेगळा आहेस कुणाल आणि मग, ११ वर्षांपूर्वी, आम्ही धाडस करत निर्णय घेतला आणि त्यावर ठाम राहिलो. आम्ही घेतलेला सर्वोत्तम निर्णय. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. असे सोहाने पोस्टमध्ये म्हटले आहे. हेही वाचा : Tejashwi Yadav : तेजस्वी यादव बनले RJD चे कार्यकारी अध्यक्ष ; लालू प्रसाद यादवांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय अभिनेता कुणाल खेमू याने देखील त्याच्या इंस्टाग्रामर पोस्ट शेअर करत स्वतःचे आणि सोहाचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. या दोन्ही पोस्टवर चाहत्यांकडून प्रेम मिळत असून, त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोहा आणि कुणाल यांचे लग्न २५ जानेवारी २०१५ रोजी झाले. यांना इनाया नावाची मुलगी आहे. सोहा अली खान ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी आहे. सोहाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती शेवटची ‘छोरी २’ चित्रपटात दिसली होती. कुणाल खेमू एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.सोहा आणि कुणालची पहिली भेट २००९ मध्ये ‘धूंधते रह जाओगे’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या भेटीत दोघांची एकमेकांसोबत मैत्री झाली त्याच वर्षी दोघेही ‘९९’ चित्रपटाच्या सेटवर पुन्हा भेटले. त्यानंतर मैत्रीने प्रेमाचा आकार घेतला. अखेर त्यानंतर दोघांनी लग्न केले. हेही वाचा : Priya Bapat : फिट राहण्यासाठी प्रियाचा चाहत्यांना मोलाचा सल्ला; डाएट संदर्भात शेअर केल्या 3 खास गोष्टी