Rohit Sofia Controversy : “तो जगातील महान फलंदाज असला, तरी बेड रुममध्ये…”, रोहितसोबतच्या ब्रेकअपवर सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा!
Rohit Sofia Controversy : सोफियाने रोहितसोबतच्या खाजगी आयुष्याविषयी थेट शेरेबाजी केल्याने क्रीडा आणि मनोरंजन विश्वात नवा वाद पेटला आहे.

Sofia Hayat Shocking Claims On Past Relationship With Rohit Sharma Podcast : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात (Sofia Hayat) आपल्या एका अत्यंत खळबळजनक विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) २०१२ मध्ये प्रेमसंबंधात असल्याचा पुनरुच्चार करत तिने त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपच्या कारणाबाबत धक्कादायक भाष्य केले आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना ५१ वर्षीय सोफियाने रोहितसोबतच्या खाजगी आयुष्याविषयी थेट शेरेबाजी केल्याने क्रीडा आणि मनोरंजन विश्वात नवा वाद पेटला आहे.
‘स्ट्रेट टॉक क्वीर विस्डम’ पॉडकास्टमध्ये बेधडक भाष्य; रोहितबाबत थेट वक्तव्य!
‘स्ट्रेट टॉक क्वीर विस्डम’ पॉडकास्टमध्ये बोलताना सोफिया म्हणाली, “मला सुरुवातीला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नव्हती; माझ्या मॅनेजरमुळे मी क्रिकेट विश्वाशी जोडली गेले. त्या काळात मी माझे वय लपवले आणि बऱ्याच गोष्टी खोट्या सांगितल्या, ज्यामुळे मी लोकप्रिय झाले. याच काळात मी भारताचा सर्वोत्तम फलंदाज असलेल्या रोहित शर्माला डेट केले. तो आज जगातील महान फलंदाज असला, तरी बेडवर तो चांगला नव्हता.” सोफियाच्या या अत्यंत वैयक्तिक आणि वादग्रस्त विधानामुळे चाहत्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
‘फक्त फॅन म्हटल्याने केले ब्लॉक’; वर्षभराच्या नात्यावर केला दावा!
Modal and actress Sofia Hayat cliams big.
She claims, “She dated one of the best cricketers in the world, GOAT, Rohit Sharma, and he is not good in bed…”😳😳
How low she can go?
Rohit Sharma is a married person and living a good marriage life … But this woman is bent to… pic.twitter.com/oYPP1qkRkf
— Sagar STORM🔳 (@AlexAllone1) September 15, 2026
सोफियाने रोहितबद्दल असा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिच्या दाव्यानुसार, २०१२ मध्ये दोघे एकमेकांना डेट करत होते आणि वर्षभर रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, एका मुलाखतीत रोहितने तिला केवळ ‘एक चाहती’ (Fan) म्हणून संबोधले होते. या गोष्टीचा प्रचंड राग आल्याने तिने रोहितशी नाते तोडत त्याला सर्व ठिकाणांवरून ब्लॉक केले होते, असेही तिने पूर्वी उघड केले होते. रोहित शर्माने मात्र आजवर तिच्या अशा कोणत्याही दाव्यावर कधीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही.
रोहित-रितिकाचा सुखी संसार; दोन मुलांसह आनंदी कुटुंब!
🚨 Sofia Hayat makes a shocking claim about Rohit Sharma. 👀
-Sofia Hayat has claimed that she dated Rohit Sharma and made critical comments about their alleged relationship, including saying Rohit Sharma was not good on bed.
-Hayat has repeatedly referenced a short-lived… pic.twitter.com/T5cTkrTkGK
— Aarya 🕊️ (@Vitamin_Vk18) September 15, 2026
दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा आपल्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत स्थिरावलेला आहे. स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रितिका सजदेहसोबत ६ वर्षे डेटिंग केल्यानंतर रोहितने १३ डिसेंबर २०१५ रोजी विवाह केला. या दांपत्याला समायरा नावाची ८ वर्षांची मुलगी आहे; तर १५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी आपल्या अहान नावाच्या गोंडस मुलाचे जगात स्वागत केले. सोफियाच्या जुन्या आणि वादग्रस्त वक्तव्यांकडे दुर्लक्ष करत रोहित सध्या आपल्या आनंदी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.





