Video : करोनामुळं नवरदेव-नवरीने काठीच्या सहाय्याने घातल्या वरमाला

मुंबई : देशात करोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम, विवाह-सोहळे यावर बंधन आली आहेत. त्यातच लग्नसोहळे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक नियम त्यासाठी लागू करण्यात आले आहेत. या नियमांचं पालन करणारा एक लग्नसोहळा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
या लग्नात नवरदेव-नवरीने काठीच्या सहाय्याने एकमेकांना वरमाला घातल्या. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही तर करोना संसर्गाचा धोका आहे. याच गोष्टीला गांभीर्याने घेऊन नवरदेव-नवरीने काठीने एकमेकांना वरमाला घातल्या. या संबंधिच्या व्हिडीओवर अनेकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
#कोरोना में शादियां सफलतापूर्वक संपन्न कराने के लिए इवेंट मैनेजर्स को क्या क्या जुगाड़ू समाधान निकालना पड़ता है…. 😅😅 pic.twitter.com/2WOc9ld0rU
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 2, 2021
लग्नात काठीतून एकदा वरमाला सरकरते. त्यावेळी एक व्यक्ती नवरदेवाच्या जवळ येऊन आपल्या हाताने काठीला वरमाला अडकवतो. त्यानंतर नवरदेव नवरीच्या गळ्यात काठीच्या साहाय्याने वरमाला टाकतो. यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात आणि जल्लोष साजरा केला जातो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद करण्यात आला आहे.





