“….तर आम्ही विरोधात बसायलाही तयार”; भाजपची भूमिका, शिंदेंच्या होमग्राऊंडवरील संघर्ष चव्हाट्यावर

Thane Municipal Corporation Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुसरा टप्पा समजल्या जाणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप सर्वच पक्षांना वरचढ ठरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांवर भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ तर शिवसेना शिंदे पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे महापालिकेत शिवसेनेने ७५ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला २८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या सगळ्यात आता भाजपकडून एक मोठा डाव टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेत गरज पडली तर आम्ही विरोधात बसायलाही तयार असल्याचे मोठं विधान केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. ठाणे महापालिकेत १३१ जागा आहेत. त्यापैकी महायुतीने १०३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.
राजकीय पक्षांचे बलाबल
नेमकं काय म्हणाले?
“आम्ही ४० जागा लढवल्या आणि २८ जागांवर यश मिळवले. २०१७ च्या तुलनेत आमच्या ५ जागा वाढल्या आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम आम्ही करू. गरज पडली तर आम्ही विरोधात बसायलाही तयार आहोत.”
ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी आपलं एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. पण आता निकाल लागल्यानंतर भाजपने वेगळी भूमिका घेण्याची तयारी दर्शवल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. महापौरपदाच्या चर्चेसाठी भाजप स्वतःहून पुढाकार घेणार नाही, असेही भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
हेही वाचा : पुणे निकालानंतर अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला; पुन्हा राजकीय भूकंपाचे





