मुंबई – करोना योद्धांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर 2020 पर्यंत एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हंटले कि, अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर करोना महामारीशी लढा देण्यास महत्त्वाची भूमिका निभावत असून एमडी/एमएसच्या परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यासंबंधी आपण मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत. जर वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पडली तर या कठीण काळात प्रशिक्षित डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासेल, असे त्यांनी सांगितले आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray has written to the Hon’ble PM @narendramodi ji requesting intervention to direct the Medical Council of India to postpone the MD/MS examination till December 2020 as the final year resident doctors are playing a crucial role in fighting this pandemic pic.twitter.com/fur87m2T1Y
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 24, 2020
दरम्यान, एमडी, एमएस, पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथीसह अन्य वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे नियोजन असल्याचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे.