Prakash Ambedkar Tweet : …तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Prakash Ambedkar Tweet : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे राजकारण तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Prakash Ambedkar Tweet : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं वक्तव्य केले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्या रिल्स येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी. भाजपने भारताचे सार्वभौम टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पायउतार करावे लागेल”, असे मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
त्यांनी एक्स अकाटऊंवरून हे वक्तव्य करत निर्वाणीचा इशारा दिला आहे. यामुळे राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. या ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी #EpsteinFiles #MujraModi हे दोन टॅग वापरले आहेत. यासोबतच इराण इस्राइल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या संघर्षावर देखील भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? Prakash Ambedkar Tweet
नरेंद्र मोदी तुमचे 15 वर्ष झाले आहेत. तुमचे सगळे गुलाम आहेत, याची मला जाणीव आहे. पण एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. त्या रील्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा. आमच्यासमोर दोनच मार्ग आहेत. एकतर देशाला वाचवा. ते जर करायचं असेल तर तुम्हाला संपवा. तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर खुर्ची खाली करा. आम्ही इथल्या भाजपवाल्यांना सांगतोय, आम्ही तुमचा राजीनामा मागत नाहीत. सत्ता तुमचीच राहणार नाही. कारण लोकांना 5 वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही निवडणूक घेणार नाही. सत्ता तुमचीच राहील. पण सत्ता राहत असताना देशाचं सार्वभौमत्व कायम राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींचा बळी द्यावा लागेल. उद्या होळी आहे, नरेंद्र मोदींचा बळी द्या, अस देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
भारताचा अमेरिकेसोबत झालेला करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे!
भारताचा अमेरिकेसोबत झालेल्या करारनाम्यातून एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे अमेरिकेची जी चिंता असेल, ती भारताची चिंता असेल. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी भारताला जुळवून घ्यावे लागणार आहे.
आरएसएसच्या मोहन भागवतला… pic.twitter.com/ShS2PIVcKq
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 2, 2026
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
वंचितकडून महाआंदोलन (Prakash Ambedkar Tweet )
एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार धोरणावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव, देश बचाव” अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. या आंंदोलनास अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता.





