LPG Shortage – युद्धामुळे देशभरात सुरू असलेल्या एलपीजी गॅस टंचाईमुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, स्वयंपाकघरापासून छोट्या व्यावसायिकांपर्यंत याचे तीव्र परिणाम दिसून येत आहेत. गॅस तुटवड्यामुळे वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर पिठलं आणि भाकरी करून नरेंदर कब मिलेगा सिलिंडर या आंदोलन केले. गॅस सिलिंडरसाठी रांगा लागत असून, अनेक घरांतील स्त्रियांना लाकूड आणि कोळशाच्या चुलींचा आधार घ्यावा लागत आहे. मग केंद्र सरकारने सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करून चहा टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, लहान हॉटेल्स बंद पडल्याने हजारो लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे. याशिवाय लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, केटरिंग व्यवसायांनाही बसला आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने जेवण बंद झाले असून, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलिंडरचा काळाबाजार तातडीने रोखावा, २५ दिवसांनीच गॅस मिळण्याची अट शिथिल करावी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावे, अशा मागण्या केल्या. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष ऍड. अरविंद तायडे, जिल्हाध्यक्ष राज कुमार, विशाल कसबे, सागर आल्हाट, ऍड. रेखा चौरे व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.