…म्हणून नांदगावकरांनी मनसे सोडली

Updated On:

मुंबई : आपल्या खळ्ळ खट्याक स्टाइलमुळे चर्चेत असलेले नितीन नांदगावकर यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नांदगावकरांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली आहे. त्यानंतर आता नांदगावकरांनी आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला या संदर्भात एक व्हिडीओ प्रसारित करत खुलासा केला आहे.

त्यांनी सदर्व केलेल्या व्हिडिओत ते म्हणाले की  “आपण सुरू केलेल्या जनता दरबारात अनेक ठिकाणाहून लोक त्यांच्या समस्या मांडण्यासाठी येत होते. त्यांचे प्रश्नही त्या माध्यमातून सोडवण्याचा मी प्रयत्न केला. या जनता दरबारामुळे मिळालेली लोकप्रियता काही मनसेच्या नेत्यांना खटकली आणि त्यांच्यामुळे जनता दरबार बंद करावा लागला.

तसंच हा जनता दरबार कायमचा बंद करण्यास सांगण्यात आलं. तसंच मनसेच्या काही नेत्यांनी हं हवं असल्यास तू तुझा पक्ष काढ असंही सांगून टाकलं. त्यामुळे दरबाराच्या माध्यमातून जनतेची सेवा करता येत नसल्यानं अखेर मला मोठा निर्णय घ्यावा लागला आणि आपण शिवसेसेनेत प्रवेश केला” असल्याचं नितीन नांदगावकर म्हणाले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Ashok Chavan : नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके दुष्काळ यादीतून वगळले; विरोधकांच्या टीकेला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

2026-09-27 13:23:55

Ashok Chavan : नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके दुष्काळ यादीतून वगळले; विरोधकांच्या टीकेला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

Amruta Fadnavis : गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं? अमृता फडणवीसांचं होतयं कौतुक

2026-09-26 19:44:17

Amruta Fadnavis : गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं? अमृता फडणवीसांचं होतयं कौतुक

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची मोठी घोषणा ! विरोधी पक्षांना केले 'हे' मोठे आवाहन

2026-09-26 19:18:17

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची मोठी घोषणा ! विरोधी पक्षांना केले 'हे' मोठे आवाहन

Meghna Bordikar: "देवाभाऊंनी पुन्हा दाखवून दिलं, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी"; मेघना बोर्डीकरांची प्रतिक्रिया

2026-09-26 15:21:52

Meghna Bordikar: "देवाभाऊंनी पुन्हा दाखवून दिलं, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी"; मेघना बोर्डीकरांची प्रतिक्रिया

Pankaja Munde: "सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार" ; पंकजा मुंडे यांचं आश्वासन

2026-09-26 14:47:13

Pankaja Munde: "सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार" ; पंकजा मुंडे यांचं आश्वासन