‘…तर आत्ताच फाशीवर लटकतो’, ब्रिजभूषण सिंग यांचे कुस्तीपटूंना open चॅलेंज

नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी आणि कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी कुस्तीपटू गेल्या दोन आठवड्यांपासून जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत.
ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंनी केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी रविवारी कुस्तीपटूंच्या निषेधावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतः फाशी घेईन” असे म्हटले आहे.
VIDEO | Members of Kirti Kisan Union join wrestlers' protest against WFI President Brij Bhushan Sharan Singh at Jantar Mantar. pic.twitter.com/GlTNvwlGC7
— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2023
दरम्यान,रविवारी जंतरमंतरवर सर्वखाप महापंचायत बोलावण्यात आली असून त्यात कुस्तीपटूंच्या या लढतीतील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. याशिवाय आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यासाठी आणखी 31 सदस्यीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.




