Sanjay Raut: “आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या…”; संजय राऊतांचे थेट अमित शाहांना पत्र
Sanjay Raut: या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) सोपवण्याची संजय राऊतांची विनंती

Sanjay Raut: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे 500 कोटी रुपये दिल्याचा आरोप करणारी ऑडिओ क्लिप समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा आवाज होता. ते आंदोलन मॅनेज करण्याबद्दल बोलत होते.
याचं ऑडिओ क्लिपमध्ये 500 कोटींचा सुद्धा उल्लेख होता, यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत लिहिले, “आदरणीय अमित शाहजी, महाराष्ट्रातील 500 कोटी रुपयांच्या प्रकरणाची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल. आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या. आता आंदोलनही विकत घेण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये देण्यासाठी भाजपने श्रीकांत शिंदे यांच्याकडे पैसे दिल्याचा आरोप आहे.
Respected Shri @AmitShah ji
The ₹500 crore matter in Maharashtra must have surely reached you by now.
Until now, the BJP has been buying MPs, MLAs, political parties and elections. Now it has begun buying agitations as well.
The BJP handed over money to Shrikant Shinde so that ₹500 crore could be given to Manoj Jarange Patil.
Where did this money come from? And did it actually reach Jarange or not?
This is a matter under the Prevention of Money Laundering Act (PMLA). Kindly entrust the investigation to the Enforcement Directorate (ED).
@Dev_Fadnavis
@PMOIndia
@BJP4India
@RSSorg— Sanjay Raut (@rautsanjay61) October 26, 2026
हा पैसा कुठून आला? आणि तो प्रत्यक्षात जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचला की नाही? हे प्रकरण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी (PMLA) संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) सोपवावा, अशी विनंती आहे.” सोबतच त्यांनी पत्राचे फोटो देखील शेअर केले आहेत.
श्रीकांत शिंदेंनी आरोप फेटाळले
दरम्यान, व्हायरल झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देताना, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना द्यायचे असलेले कोणतेही पैसे आपल्याला मिळाल्याचे नाकारत आरोप फेटाळले आहेत.
श्रीकांत शिंदे म्हणाले, ज्या व्यक्तीला ५०० कोटी रुपये देण्यात आले होते, त्या व्यक्तीचा मी सुद्धा शोध घेत आहे. ते पैसे माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. जरांगे यांच्यासारखाच माझाही हाच प्रश्न आहे, असे शिंदे म्हणाले.
५०० कोटी रुपयांचा साठा कसा दिसेल आणि तो वाहून नेण्यासाठी किती वाहने लागतील, याचा आम्ही विचार करत होतो, असे ते गंमतीने पुढे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, ज्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
PG Portal: तक्रारींचा डोंगर, पालिकेचा कारभार ढिम्म; पाच हजार तक्रारी धूळ खात





