मुंबई – भाजपा खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका करताना अप्रत्यक्षपणे भाजपाशी संबंध जोडल्यानंतर आता याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या केलेल्या टीकेबाबत आभार मानत फडणवीसांनी, ‘चांगली कामं करणारे भाजपामध्येच आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो’ असा टोला लगावला.
यावेळी बोलताना फडणवीसांनी, “कोणीही चांगलं काम केलं तर त्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. सोनू सूद यांनी चांगलं काम केल्याबरोबर ते भाजपाचे आहेत, असं सांगितलं गेलं. शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो की चांगलं काम करणारे हे भाजपामध्येच आहेत. आम्हाला याचा आनंद आहे आणि त्यांचा आभारी आहे. पण सोनू सूद यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून सांगतो, त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर एक चांगलं समजाकार्य केलं आहे. त्या कामाचं कौतुक झालं पाहिजे,” अशा शब्दांमध्ये शिवसेनेला टोला लगावला.
“आम्ही जेव्हा जलायुक्त शिवारचं काम करायचो तेव्हा नाम संस्था आणि आमीर खान मदत करायचे. आम्ही हेवादावा केला नाही. ते सरकारला मदतच करत होते. त्यांचं आम्ही कौतुकच केलं. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. अशा बाबतीत राजकारण करणे हे चुकीचे आहे”. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी भाजपाकडून ट्रकमधून मदत पाठवण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.