Snehal Tarde : स्नेहल तरडेंचे वटपौर्णिमानिमित्त महिलांना खास आवाहन
Snehal Tarde : पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरा करण्यासाठी सांगितली एक सुंदर कल्पना

Snehal Tarde : अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी ‘देऊळ बंद २’ चित्रपटात मुख्यभूमिका साकाराली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता स्नेहल तरडेने वटपौर्णिमानिमित्त महिलांना खास आवाहन केले आहे. स्नेहल तरडेंनी रील शेअर करत एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. (Snehal Tarde )
स्नेहल तरडेंनी कॅप्शनमध्ये महिलांना झाडे लावून वटपौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन केले आहे. स्नेहल तरडे यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला एक प्रेमळ आवाहन करू का? वटपौर्णिमा जवळ आली आहे. (Snehal Tarde )
या वटपौर्णिमेला तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने एक वडाचं रोपटं तुमच्या घराजवळच्या मोकळ्या जागेत, एखाद्या टेकडीवर, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत जिथे तुम्हाला अधून मधून जाणं शक्य असेल अशा कोणत्याही ठिकाणी लावा आणि ते वाढवा.”
View this post on Instagram
पुढे त्यांनी लिहिलं, “दरवर्षी तुम्ही स्वतः लावलेल्या त्या वडाची पूजा करा. तुम्ही वाढवलेला तो एक वड अनेक पक्ष्यांना निवारा देईल, वाटसरूंना सावली देईल, परिसर हिरवा आणि थंड राखण्यासाठी मदत करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नसताना देखील पुढची शेकडो वर्षे तुमच्या आणि तुमच्या पतीच्या प्रेमाची साक्ष देत दिमाखात उभा राहील. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!” (Snehal Tarde)
या व्हिडिओमध्ये स्नेहल तरडे यांनी वडाच्या झाडाला उद्देशून त्या म्हणाल्या, “चांगल्या जागेमध्ये लावलं आहे तुला…त्यामुळे चांगला मोठा हो. आता छोट्या जागेमध्ये नाही तू, आता तुला मोठी जमीन आहे; त्यामुळे छान मोठा हो…” शेवटी त्यांनी वटवृक्षाला नमस्कार केला आणि श्री स्वामी समर्थ म्हणून आशीर्वाद घेतले. (Snehal Tarde)
स्नेहल तरडेंची मुख्य भूमिका असलेला ‘देऊळ बंद २’चे शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत. फक्त महाराष्ट्रासह विविध देशांमध्ये या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. (Snehal Tarde)
हेही वाचा:
Raveena Tandon : तो अजिबात बदललेला नाही; 22 वर्षांनंतर अक्षयसोबत काम करताच रवीना टंडन भरभरून बोलली





