Marathi Movie Box Office : बॅाक्स अॅाफिसवर मराठीचा बोलबाला! ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’ नंतर आता आणखी एका चित्रपटाची हवा
Marathi Movie Box Office : या चित्रपटातील एका अनोख्या आणि कल्पनेपलीकडच्या ‘युनिव्हर्स’ची मोठ्या पडद्यावर मांडणी करण्यात आली आहे.

Marathi Movie Box Office : सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा बोलबाला सुरू आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर आता ‘घबाडकुंड’ या नव्या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रदर्शनापूर्वीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातला आहे.
‘घबाडकुंड’मध्ये संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे आणि प्राजक्ता हनमघर यांसारखी दमदार स्टारकास्ट झळकली आहे. या चित्रपटातील एका अनोख्या आणि कल्पनेपलीकडच्या ‘युनिव्हर्स’ची मोठ्या पडद्यावर मांडणी करण्यात आली आहे. हा एक हॅारर चित्रपट असून, याचे दिग्दर्शन प्रितम एस. के. पाटील यांनी केले आहे. याअगोदर त्यांनी अल्याड पल्याड चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. (Marathi Movie Box Office)
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने चौथ्या दिवशी ४९ लाख रुपयांची कमाई केली आहे. ओपनिंग दिवशी चित्रपटाने ४२ लाखांची कमाई केली होती. त्यानंतर कमाईत टप्प्याटप्प्याने वाढ होत असून, येत्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट दमदार कमाई करेल असे सांगितले जात आहे. (Marathi Movie Box Office)
हेही वाचा : Sara Ali Khan: लंडनमध्ये आई आणि आजीसोबत सारा अली खानची धमाल; खास फोटो पाहून चाहते खुश
आतापर्यंत ‘घबाडकुंड’ने एकूण २.९२ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन जमवले आहे. ६ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास ४८.६ टक्के खर्च वसूल केला आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार लवकरच हा चित्रपट आपले संपूर्ण बजेट रिकव्हर करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Marathi Movie Box Office)

Ghabadkund Box Office Collection
विशेष म्हणजे, २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘घबाडकुंड’ सातव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ‘राजा शिवाजी’ (१०५.६८ कोटी), दुसऱ्या स्थानावर ‘देऊळ बंद 2’ (७२.२४ कोटी) आणि तिसऱ्या स्थानावर ‘क्रांतीज्योती विद्यालय’ (२८ कोटी) आहे. त्यानंतर ‘तुंबाडची मंजुळा’, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणतंय सासूबाई?’ आणि ‘सुपर डुपर’ यांचा समावेश होतो. (Marathi Movie Box Office)
आता सर्वांचे लक्ष ‘घबाडकुंड’च्या कमाईकडे लागले आहे. हा चित्रपट पुढील दिवसांत मोठा रेकॉर्ड मोडून पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





