Raveena Tandon : तो अजिबात बदललेला नाही; 22 वर्षांनंतर अक्षयसोबत काम करताच रवीना टंडन भरभरून बोलली
Raveena Tandon : चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून या पुनर्मिलनाची विशेष चर्चा रंगली आहे.

Raveena Tandon : नुकताच बहुचर्चित ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनंतर अक्षय कुमार (Akshy Kumar ) आणि रवीना टंडन ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून या पुनर्मिलनाची विशेष चर्चा रंगली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीना टंडनने अक्षय कुमारसोबत पुन्हा काम करण्याचा अनुभव शेअर केला. एएनआयशी संवाद साधताना ती म्हणाली, “इतक्या वर्षांनंतर अक्षयसोबत काम करणं हा खूप आनंददायी अनुभव होता. तो अजिबात बदललेला नाही. आजही तो तितकाच मेहनती, शिस्तप्रिय आणि आपल्या कामाप्रती समर्पित आहे. त्याने मिळवलेलं यश हे त्याच्या अथक मेहनतीचं फळ आहे.” (Raveena Tandon )
रवीनाने पुढे सांगितले की, अक्षय सेटवर नेहमीच उत्साही आणि सक्रिय असतो. त्याची कामाप्रती असलेली निष्ठा आणि सातत्यपूर्ण मेहनत हेच त्याच्या लोकप्रियतेचं खरं रहस्य असल्याचं तिने नमूद केलं. (Raveena Tandon )
हेही वाचा : Raj Thackeray : राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा! राज ठाकरे विश्वास नांगरे पाटलांवर भडकले
अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी यापूर्वी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘मोहरा’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘बारूद’, ‘दावा’ आणि ‘कीमत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली असून ‘वेलकम टू द जंगल’मधून त्यांची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे. (Raveena Tandon )

Raveena Tandon : तो अजिबात बदललेला नाही; 22 वर्षांनंतर अक्षयसोबत काम करताच रवीना टंडन भरभरून बोलली
या चित्रपटात अक्षय आणि रवीनासोबत सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, राजपाल यादव, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता आणि अर्शद वारसी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (Raveena Tandon )
हेही वाचा : Gold ring : सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यास नवजात बालकाला सोन्याची अंगठी भेट; ‘या’ राज्याचा निर्णय





