SL vs BAN : लाइव्ह सामन्यात ७ फूट लांब सापाचा थरार, VIDEO होतोय व्हायरल

SL vs BAN 1st ODI Match Snake Interrupts : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर २ जुलैपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. ही मालिका तीन सामन्यांची आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यान अशी एक घटना घडली, ज्यामुळे दोन्ही संघांचे खेळाडू घाबरले.
खरेतर, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान अचानक मैदानावर एक ७ फूट लांबीचा साप घुसला. हे तेव्हा घडले जेव्हा बांगलादेशचा संघ फलंदाजी करत होता. साप मैदानावर घुसल्यानंतर सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मैदानात अचानक घुसला साप –
#snake #Cricket pic.twitter.com/Y5KMfE94aZ
— ABHISHEK PANDEY (@anupandey29) July 3, 2025
बांगलादेशचा संघ श्रीलंकेने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला होता. सामन्यादरम्यान तिसऱ्या षटकातील खेळ सुरू होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूच्या वेळी अचानक कॅमेऱ्यात साप दिसला. हा साप सरपटत मैदानाच्या दिशेने येत होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक पंचाने सामना थांबवला.
हेही वाचा – Mohammed Shami : ‘शमीला अहंकार; मुलीशी संपर्क नाही!’, हसीन जहांची मोहम्मद शमीवर पुन्हा टीका
ग्राउंड स्टाफची दिसली सतर्कता –
आर. प्रेमदासा स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत सापाला मैदानाबाहेर काढले. त्यानंतर काही मिनिटांतच सामना पुन्हा सुरू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वीही श्रीलंकेतील मैदानांवर सापांची उपस्थिती दिसून आली आहे. याआधी अनेकदा साप मैदानात घुसल्यामुळे सामना थांबवावा लागला आहे.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
श्रीलंकेने जिंकला सामना –
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेने बांगलादेशचा ७७ धावांनी पराभव केला. यासह श्रीलंकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 167 धावांत गारद झाला. श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने ४, तर कामिंदु मेंडिसने ३ विकेट्स घेतल्या.





