Smriti Mandhana: स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल लवकरच अडकणार विवाहबंधनात ; ‘ही’ आहे लग्नाची तारीख

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मंधाना आपल्या उत्कृष्ट खेळासोबतच सौंदर्य आणि स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. तिची लोकप्रियता बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात.आता स्मृती एका नव्या आणि खास कारणामुळे चर्चेत आली आहे ती म्हणजे तिचं लग्न!
स्मृती आणि पलाश लवकरच विवाहबंधनात
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती मंधाना लवकरच तिच्या दीर्घकाळचा मित्र आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता तसेच दिग्दर्शक पलाश मुच्छलशी लग्न करणार आहे.
दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून, त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या गोड नात्याचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत.
२० नोव्हेंबरला सांगलीत सात फेरे
रिपोर्टनुसार, या जोडप्याचा विवाह सोहळा २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे पार पडणार आहे. सांगली हे स्मृतीचं मूळ गाव आहे.
तथापि, अद्याप स्मृती किंवा पलाश यांच्या कडून या तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
काही काळापूर्वी पलाशने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी लवकरच स्मृतीला इंदौरची सून बनवणार आहे.”
त्यांची प्रेमकथा
स्मृती आणि पलाशची ओळख २०१९ मध्ये झाली आणि दोघांनी आपलं नातं जवळपास पाच वर्षं गुप्त ठेवले.
२०२४ मध्ये त्यांनी शेवटी आपल्या नात्याला अधिकृत मान्यता दिली.
आता अखेर हे लोकप्रिय जोडपं विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे.
स्मृतीचा सध्याचा व्यस्त कार्यक्रम
सध्या स्मृती मंधाना ५० षटकांच्या महिला विश्वचषकात व्यस्त आहे.
३० ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यात ती भारतीय संघाची महत्त्वाची खेळाडू असेल.
या सामन्यात पलाश स्वतः तिचे उत्साहवर्धन करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.
कोण आहेत पलाश मुच्छल?
पलाश मुच्छल हे प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांचे भाऊ आहेत. ते स्वतःही गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक आहेत.
फक्त १८ व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं कंपोज केलं आणि ते बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकार म्हणून ओळखले गेले.
त्यांनी राजपाल यादव आणि रुबीना दिलैक यांच्या ‘अर्ध’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला





