Smriti Palash Wedding : विजयाची सवय कायम! लग्नापूर्वीच्या सामन्यातही स्मृतीने पलाशच्या संघाला चारली धूळ, पाहा VIDEO

Smriti Palash Wedding Cricket Match : विश्वचषक विजेती स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकून मंधानाला जणू विजयाची सवयच लागली आहे, जी तिने आपल्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्येही कायम ठेवली आहे. महाराष्ट्रातील सांगली येथे उद्या (२३ नोव्हेंबर) हे दोघे सात फेरे घेऊन विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये स्मृतीने क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा विजय मिळवत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
हळदीनंतर रंगला क्रिकेटचा महासंग्राम –
Smriti Mandhana is playing cricket with her soon-to-be husband Palash Muchhal at their wedding event.🙇🏻 pic.twitter.com/8o5nXiqijN
— Mention Cricket (@MentionCricket) November 22, 2025
क्रिकेटनेच स्मृतीला ओळख दिली असून, याच खेळामुळे ती पलाशशी जोडली गेली आहे. त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळच्या वेळी ‘ब्राइड स्क्वॉड’ (वधूचा संघ) आणि ‘ग्रूम स्क्वॉड’ (वराचा संघ) यांच्यात खास क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणेच दोन्ही कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
At Palash Muchhal and Smriti Mandhana’s wedding, they formed teams, did a cricket-style toss, and even acted it out.❤️🏏 pic.twitter.com/xgD27pLGBT
— Mention Cricket (@MentionCricket) November 22, 2025
पलाशच्या संघाचा टिकाव लागला नाही –
they all are a riot together i love them pic.twitter.com/SJAYe90hrH
— mufaddal bkl hai (@mandhanamp4) November 22, 2025
स्मृती ‘ब्राइड स्क्वॉड’ची कर्णधार होती, तर पलाशने ‘ग्रूम स्क्वॉड’चे नेतृत्व केले. स्मृतीच्या संघात जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रेणुका सिंग आणि रिचा घोष यांसारख्या नुकत्याच वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या स्टार खेळाडूंचा समावेश असल्याने, पलाशच्या संघाचा टिकाव लागणे कठीण होते. अपेक्षितपणे, ‘ब्राइड स्क्वॉड’ने हा सामना जिंकला आणि स्मृतीने विजयाची परंपरा कायम राखली.
हेही वाचा – AUS vs ENG : ट्रॅव्हिस हेडचा ऐतिहासिक तडाखा! १२३ वर्षांचा विक्रम मोडत रचले चार मोठे कीर्तिमान
या सामन्यातील धावसंख्या किंवा विकेट्सचे आकडे समोर आले नसले तरी, स्मृती फलंदाजी करतानाचे आणि विजयी संघाच्या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या खास क्षणांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून, आता सगळ्यांना २३ नोव्हेंबरला स्मृतीला वधूच्या रूपात पाहण्याची प्रतीक्षा आहे.





