Smriti Mandhana Video : स्मृती झाली ‘क्लीन बोल्ड’; पलाश मुच्छलने स्टेडियमवर केले रोमँटिक प्रपोज! पाहा VIDEO

डीवाय पाटील स्टेडियमवर रोमँटिक प्रपोजल –
पलाशने स्मृतीला थेट नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुडघे टेकून प्रपोज केले. पलाश मुच्छलने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर या खास क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सुरुवात पलाश आणि स्मृती यांच्या स्टेडियममधील एंट्रीने होते.
WATCH | Palash Muchhal PROPOSES Smriti Mandhana at the World Cup final venue.#PalashMuchhal #SmritiMandhana #WomenCricket #WomensWorldCup2025 pic.twitter.com/zlPp2hZthl
— The Tatva (@thetatvaindia) November 21, 2025
स्मृती मानधनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि ती हटवताच, पलाश गुडघे टेकून तिला गुलाबाचा गुच्छ आणि अंगठी देत लग्नाची मागणी घालतो. हे बघून स्मृती खूप आनंदी होते आणि ‘हो’ म्हणत ती अंगठी स्वीकारते. यानंतर स्मृती देखील पलाशला अंगठी घालते आणि दोघेही आनंदाने आपली ‘एंगेजमेंट रिंग’ फ्लॉन्ट करताना दिसतात. विशेष म्हणजे, याच मैदानावर भारतीय महिला संघाने २०२५ चा विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता.
हेही वाचा – IND vs SA : फक्त गिलच नाही तर ‘हा’ स्टार खेळाडू देखील दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-११ मधून होणार बाहेर
२०१९ पासून रिलेशनशिपमध्ये –
View this post on Instagram
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल दोघेही २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकवेळा त्यांना एकत्र पाहण्यात आले आहे आणि ते सोशल मीडियावरही त्यांचे फोटो शेअर करत असतात. नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषक २०२५ दरम्यानही पलाश मुच्छल स्मृतीसोबत होता आणि त्यांनी संघाच्या विजयाचा आनंद एकत्र साजरा केला होता. स्मृती मानधनाने अलीकडेच सोशल मीडियावर एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला होता.





