Smriti Mandhana : ‘माझ्यामुळे सामना हातून निसटला…’, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर स्मृती भावूक; म्हणाली, ‘मी जर…”

Smriti Mandhana took responsibility for the defeat : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मधील 20वा सामना खूपच रोमांचक झाला. ज्यामध्ये भारताला इंग्लंडकडून अवघ्या 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या भारतीय संघाची सामन्यावर सुरुवातीला मजबूत पकड होती, परंतु शेवटच्या षटकांमध्ये विकेट्स गमावल्याने हा सामना हातून निसटला. उपकर्णधार स्मृती मंधानाने 88 धावांची दमदार अर्धशतकी खेळी करूनही पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
स्मृती पराभवानंतर भावुक फोटो व्हायरल –
भारतीय संघाला इंग्लंडने दिलेल्या 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात मिळाली होती. स्मृती मंधानाने एक बाजू सांभाळत 88 धावांची शानदार खेळी केली, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 70 धावा आणि दीप्ती शर्माने 50 धावांचे योगदान दिले. मात्र, स्मृतीच्या विकेटनंतर भारतीय डावाला खिंडार पडली. कारण त्यानंतर सततच्या विकेट्सच्या पतनामुळे संघाला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ज्यानंतर स्मृती भावूक झालेली दिसली, जिचा फोटो व्हायरल होत आहे.
स्मृतीच्या जिव्हारी लागला पराभव –
🥺💔 Smriti Mandhana got emotional after India’s loss to England.
Her reactions say it all… 🙏🇮🇳#SmritiMandhana #TeamIndia #WWC2025 #WomensCricket pic.twitter.com/HCj4OSH5Cz
— Rahul Yadav (@RahulYadav61762) October 19, 2025
सामन्यानंतर स्मृती मंधाना पराभवाचे खापर स्वतःवर फोडले. ती म्हणाली, “आम्हाला फक्त 6 च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. कदाचित आम्ही खेळ आणखी पुढे नेला असता, तर बरे झाले असते. मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारते, कारण विकेट्स पडायला माझ्यापासूनच सुरुवात झाली.” तिने पुढे सांगितले, “मला वाटले की मी त्यांच्या गोलंदाजीचा सामना करू शकते. मी कव्हरच्या वरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या फटक्याचे टायमिंग चुकले. कदाचित तो फटका मी मारायला नको होता. मी आणखी संयम ठेवायला हवा होता, कारण मी संपूर्ण डावात स्वतःला संयम राखण्याचा आणि मोठे फटके टाळण्याचा सल्ला देत होते.”
हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृती मंधाना लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत! इंदूरची होणार सून, बॉयफ्रेंडने केली घोषणा
पुढील सामन्यांमध्ये सावध खेळावं लागणार –
भारताने विश्वचषकात यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने गमावले असून, या पराभवाने उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी संघाला पुढील सामन्यांमध्ये अतिशय सावध खेळ करावा लागेल. स्मृतीच्या खेळीने तिच्या फॉर्मात परतण्याचे संकेत दिले असले, तरी हा पराभव भारतीय संघासाठी धक्कादायक ठरला आहे.





