ICC Women’s World Cup 2022 | स्मृती बनली पाच हजारी मनसबदार
Updated On:

हॅमिल्टन – भारताच्या महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधाना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी सामन्यात स्मृतीने ही कामगिरी केली.
आतापर्यंत या स्पर्धेत स्मृतीने 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. स्मृतीने मंगळवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 17 वी धाव पूर्ण करताच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या.
स्मृतीने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजार 717, कसोटीमध्ये 325 व टी-20 मध्ये 1 हजार 971 अशा मिळून एकूण 5 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला आहे. तिच्यापूर्वी कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनी ही कामगिरी केली आहे.





