IND W vs AUS W : मंधाना-रावलची ऐतिहासिक भागीदारी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोडला ५२ वर्षांचा विक्रम!

IND W vs AUS W Smriti Pratika record breaking Partnership : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मंधाना-रावल या सलामीवीर जोडीने आक्रमक सुरुवात करत पहिल्या गड्यासाठी 155 धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीने केवळ भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले नाही, तर 52 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचे लक्ष्य ठेवले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील सर्वात मोठी सलामी भागीदारी –
महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी सलामी भागीदारी इंग्लंडच्या बेकवेल आणि थॉमस यांच्या नावावर होती, ज्यांनी 106 धावांची भागीदारी केली होती. आता स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी 155 धावांची भागीदारी करत हा विक्रम मोडला. या कामगिरीसह ही जोडी महिला वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 150 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करणारी पहिली सलामी जोडी ठरली आहे.
A spectacular start courtesy #TeamIndia openers 🇮🇳
8️⃣0️⃣ (66) for Smriti Mandhana
7️⃣5️⃣ (96) for Pratika RawalThe duo added a blistering 1️⃣5️⃣5️⃣ for the first wicket 🔥
Updates ▶ https://t.co/VP5FlL2S6Y#WomenInBlue | #INDvAUS | #CWC25 | @mandhana_smriti pic.twitter.com/Tyzsb3owIE
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
सहाव्या शतकी भागीदारीच्या जवळ –
Putting up a sensational performance at the 🔝 of the order 🫡
Smriti Mandhana 🤝 Pratika Rawal
Scorecard ▶ https://t.co/VP5FlL2S6Y#WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS | @mandhana_smriti pic.twitter.com/QEPaNc7q8A
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
मंधाना आणि रावल यांची ही भागीदारी वनडे क्रिकेटमधील त्यांची सहावी शतकी भागीदारी म्हणून नोंदली गेली आहे. यामुळे त्या मिताली राज आणि पूनम राऊत यांच्या सात शतकी भागीदारीच्या विक्रम मोडण्यापासूव केवळ एक पाऊल दूर आहेत. ही कामगिरी या सलामी जोडीच्या सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह प्रदर्शनाचे द्योतक आहे.
हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीचा सोशल मीडियावरही जलवा! एका इन्स्टा पोस्टमधून करतो कोट्यवधींची कमाई!
शतकं हुकली, पण दोघींनीही साकारली दमदार खेळी –
𝙄𝙣𝙣𝙞𝙣𝙜𝙨 𝘽𝙧𝙚𝙖𝙠! #TeamIndia post a formidable 330 on the board! 💪
8️⃣0️⃣ for vice-captain Smriti Mandhana
7️⃣5️⃣ for Pratika Rawal
Crucial 3️⃣0️⃣s from Harleen Deol, Richa Ghosh & Jemimah RodriguesOver to our bowlers now. 👍
Scorecard ▶ https://t.co/VP5FlL2S6Y… pic.twitter.com/KOpyOAfjjT
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
या सामन्यात दोन्ही फलंदाजांना शतक झळकावण्याची संधी होती. स्मृती मंधानाने 66 चेंडूंमध्ये 80 धावांची शानदार खेळी केली, तर प्रतिका रावलने 96 चेंडूंमध्ये 75 धावा केल्या. मागील तीन सामन्यांत त्यांचा फलंदाजीतील फॉर्म खास नव्हता, परंतु या सामन्यात त्यांनी आक्रमक सुरुवात करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला. ज्यामुळे भारतीय संघाला 48.5 षटकांत सर्वबाद 330 धावांपर्यंत मजल मारता आली.
हेही वाचा – IND vs WI : कर्णधार गिलचा मैदानावर दिसला ‘सुपरमॅन’ अवतार, हवेत सूर मारत पकडला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO
उभारली मजबूत धावसंख्या –
या भागीदारीने भारतीय संघाला सामन्यात मजबूत धावसंख्या उभारता आली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांच्या सलामी जोडीने हे सिद्ध केले की, जेव्हा त्या लयीत असतात, तेव्हा कोणत्याही प्रतिस्पर्धी गोलंदाजी आक्रमणाला आव्हान देऊ शकतात. त्यांच्या या भागीदारीने केवळ संघाच्या धावसंख्येला उंचीवर नेले नाही, तर महिला वनडे विश्वचषकाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला आहे.





