Smriti Irani : स्मृती इराणी दोन दिवसांच्या जेद्दाहच्या दौर्यावर रवाना

Smriti Irani – अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी या दोन दिवसांच्या जेद्दाहच्या दौर्यावर रवाना झाल्या आहेत. हज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आणि सौदी अरेबियाबरोबर २०२४ च्या हज संबंधीच्या करारावर स्वाक्षर्या करण्यासाठी त्या जद्दाहला गेल्या आहेत.
आगामी हज २०२४ शी संबंधित परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्या सौदी अरेबियाचे हज आणि उमराह व्यवहार मंत्री तौफिक बिन फवझान अल रबिया यांच्याशी द्विपक्षीय बैठकही घेतील, असे जेद्दाहमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाने एका निवेदनात.सांगितले.
स्मृती इराणी यांच्या समवेत गेलेले शिष्टमंडळ सौदी अरेबियातील भारतीय व्यापारी समुदाय आणि भारतीय प्रतिनिधींनाही भेटणार आहे. अलिकडच्या वर्षांत भारत-सौदी भागीदारी अधिक घट्ट झाली आहे, विविध क्षेत्रांमधील भागीदारीमुळे हे संबंध अधोरेखित झाले आहेत.
या भेटीमुळे धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल आणि हजला या नातेसंबंधातील एक महत्त्वाचा आयाम म्हणून स्थान मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.





