स्टिव्ह स्मिथ अव्वलस्थानी कायम

आयसीसी कसोटी क्रिकेट रॅंकिंग

दुबई – आयसीसीने नुकतेच जाहिर केलेल्या कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मित्य्हने आपले अव्वलस्थान कायम राखले असून विराट कोहली दुसऱ्यास्थानी कायम आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना क्रमवारीत बढती मिळाली आहे.

स्मिथने ऍशेस मालिकेतील 4 सामन्यात 774 धावा केल्या. त्यामुळे स्मिथ 937 गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे, तर 903 गुणांसह कोहली दुसऱ्या स्थानी स्थिर आहे. ऋषभ पंतने देखील या क्रमवारीत बढती घेत 21 वे स्थान पटकावले आहे.

तर, अखेरच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मॅथ्यू वेडने 32 स्थानांची झेप घेत 78 वे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर मिचेल मार्शने गोलंदाजांच्या क्रमवारीत 20 स्थानांची झेप घेत 54 वे स्थान पटकावले आहे. तर, पॅट कमिन्सने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे.

मात्र, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची 7 स्थानांनी घसरण झाली असून तो 24 व्या स्थानी फेकला गेला आहे. इंग्लंडच्या संघातील वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला प्रथमच टॉप 40 मध्ये स्थान मिळाले आहे, तर सॅम करन 6 स्थानांची बढती घेत 65 व्या स्थानी विराजमान झाला आहे. तर, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्यास्थानी विराजमान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.