देशातील कोविड रूग्णांमध्ये किंचीत वाढ
Updated On:

नवी दिल्ली – देशात कालच्या तुलनेत आज कोविड रूग्णांच्या संख्येमध्ये किंचीतशी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात एकूण 3688 नवीन कोविड केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. त्या आधीच्या 24 तासांत देशात नोंदवल्या गेलेल्या कोविड रूग्णांपेक्षा ही संख्या 883 ने जास्त आहे.
आज दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट 0.74 टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट 0.66 टक्के इतका नोंदवला गेला आहे. दरम्यान काल दिवसभरात कोविड मुळे मरण पावलेल्यांची संख्या एकूण 50 इतकी होती. मात्र त्यापैकी 45 मृत्यू एकट्या केरळ राज्यांतील आहेत.
दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन जण या काळात दगावले आहेत. तर उत्तरप्रदेशात एक जण दगावला आहे. देशात कोविडचे सध्या एकूण 18 हजार 684 सक्रिय बाधित आहेत.





