Fake Universities : देशातील ३२ विद्यापीठ बोगस; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठांचा समावेश
देशात बोगस आणि बनावट विद्यापीठांचा मोठा खुलासा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने संपूर्ण देशातील ३२ विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे.

Fake Universities : देशात बोगस आणि बनावट विद्यापीठांचा मोठा खुलासा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने संपूर्ण देशातील ३२ विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. या शैक्षणिक संस्थेत डिग्री घेणा-या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षण नाकारले जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.
यूजीसीने विद्यार्थ्यांना कुठल्याही कॉलेज अथवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची मान्यता तपासण्याचे आवाहन केले आहे. या ३२ विद्यापीठांना केंद्र सरकार, राज्य सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नसल्याने आयोगाने म्हटले आहे.
यूजीसीने सांगितले की, यूजीसीच्या कलम २(एफ) आणि ३ अंतर्गत केवळ मान्यता प्राप्त संस्थांना डिग्री देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या संस्थाव्यतिरिक्त इतर कुठल्याही बनावट विद्यापीठ अथवा संस्थेकडून घेतलेली डिग्री बेकायदेशीर ठरेल. या यादीत दिल्लीतील सर्वाधिक १२ विद्यापीठे बनावट आहे.
तसेच महाराष्ट्रातील २ विद्यापीठे असून राजा अरबी विद्यापीठ (नागपूर) आणि राष्ट्रीय मागास कृषी विद्यापीठ (सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय इतर राज्यातही काही शिक्षण संस्था कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितले.
कोणत्या राज्यात किती बनावट विद्यापीठे?
दिल्ली – १२
उत्तर प्रदेश – ४
आंध्र प्रदेश – २
कर्नाटक – २
केरळ – २
महाराष्ट्र – २
पुदुच्चेरी – २
पश्चिम बंगाल – २
अरुणाचल प्रदेश – १
हरियाणा – १
झारखंड – १
राजस्थान – १





