Sri Lanka El Nino : अल निनोच्या प्रभावामुळे श्रीलंकेत पिण्याच्या पाण्याची टंचाई
अल निनोमुळे श्रीलंकेच्या काही भागांमध्ये तापमानवाढ, अत्यल्प पाऊस आणि शुष्क हवामान असे परिणामदेखील दिसत आहेत, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Sri Lanka El Nino – अल निनोच्या परिणामामुळे श्रीलंकेतील तब्बल १ लाख १५ हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. अल निनोमुळे श्रीलंकेच्या काही भागांमध्ये तापमानवाढ, अत्यल्प पाऊस आणि शुष्क हवामान असे परिणामदेखील दिसत आहेत, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एल निनोची स्थिती विकसित होत असताना सध्याच्या हवामानाच्या पद्धतीवर परिणाम करत असावी. असे हवामान विभागाचे महासंचालक अजित विजेमन्ना म्हणाले.
श्रीलंकेच्या २५ प्रशासकीय जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यांमध्ये एल निनो हवामान प्रणालीमुळे ११५,५८६ लोकांना फटका बसला असल्याचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राने म्हटले आहे.
तीव्र उष्णता आणि पावसाच्या कमतरतेमुळे अनेक भागांवर परिणाम झाला असून, त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत.
उत्तर-मध्य अनुराधापुरा जिल्ह्यात, सुमारे ३,५०० एकर-फूट क्षमता असलेल्या एरवेवा जलाशयातील पाण्याची पातळी जवळपास १,००० एकर-फूटपर्यंत खाली आली आहे. मध्य भागातील मातले आणि ईशान्येकडील नंदिकडल यांसारख्या भागांमध्येही पाण्याची पातळी घटली आहे, असे सिंचन अधिकाऱ्यांनी सांगितले.





