Asia Cup 2025 : मोहम्मद नबीने एकाच षटकात ५ षटकार ठोकत रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

मोहम्मद नबीचा ऐतिहासिक पराक्रम –
श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना मोहम्मद नबीने अवघ्या 22 चेंडूंमध्ये 60 धावांची खणखणीत खेळी केली. यात 3 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने शेवटच्या षटकात तब्बल 5 षटकार ठोकले. या खेळीच्या जोरावर नबीने आशिया कपच्या टी-20 स्वरूपात अर्धशतक झळकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा मान मिळवला. वयाच्या 40 वर्षे आणि 260 दिवसांत नबीने हा पराक्रम केला. 2010 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नबीने आतापर्यंत 7 अर्धशतके झळकावली आहेत.
मोहम्मद नबीने शेवटच्या षटकात ठोकले 5 षटकार –
Mohammad Nabi lit up the Abu Dhabi skyline with some fireworks of his own 🎇💫
Watch the #DPWorldAsiaCup2025, from Sept 9-28, 7 PM onwards, LIVE on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SLvAFG pic.twitter.com/nseqjt4zJJ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 18, 2025
मोहम्मद नबीने शेवटच्या षटकात 5 षटकार मारले आणि 32धावा केल्या. श्रीलंकेचा दुनिथ वेल्लालगे हा षटक टाकत होता. नबीने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारले. चौथा चेंडू नो-बॉल होता. त्यानंतर नबीने पुढच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारले. नबीला शेवटच्या चेंडूवर षटकार मारून इतिहास घडवण्याची संधी होती, पण तो तसे करू शकला नाही. तो शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्यासाठी धावला आणि दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला. अशा प्रकारे, त्याने या एका षटकात एकूण ३२ धावा चोपल्या.
हेही वाचा – Mohammad Nabi : मोहम्मद नबीने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू!
अफगाणिस्तानची खेळी आणि श्रीलंकेची गोलंदाजी –
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 169 धावांचा डोंगर उभा केला. मोहम्मद नबीच्या 60 धावांच्या तुफानी खेळीमुळे अफगाणिस्तानला हा स्कोअर गाठता आला. नबी व्यतिरिक्त कर्णधार राशिद खान आणि इब्राहिम झाद्रन यांनी प्रत्येकी 24 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेच्या गोलंदाजीमध्ये नुवान तुषाराने 4 षटकांत केवळ 18 धावांत 4 बळी घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा – Asia Cup 2025 सामन्यादरम्यान दुनिथवर वेल्लालगेवर कोसळला दु:खाचा डोंगर, क्रिकेटविश्व हळहळले!
श्रीलंकेचा विजय आणि सुपर-4 मध्ये प्रवेश –
प्रत्युत्तरात 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 18.4 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. कुसल मेंडिसने 52 चेंडूंमध्ये 10 चौकारांसह 74 धावांची दमदार खेळी केली, तर कुसल परेराने 28 आणि कामिंदु मेंडिसने नाबाद 26 धावा जोडल्या. या विजयासह श्रीलंकेने सुपर-4 मध्ये प्रवेश केला, तर अफगाणिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या सामन्यात मोहम्मद नबीच्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधले, परंतु श्रीलंकेच्या संयमित खेळीने त्यांना विजय मिळवून दिला.





