कौशल्य विकास घोटाळा प्रकरण ! चंद्राबाबू नायडू यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी ; अटकेच्या निषेधार्थ आज आंध्रप्रदेश बंदची हाक

नवी दिल्ली : तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास घोटाळ्यात अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आहे. चंद्राबाबू नायडू न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून अटकेच्या निषेधार्थ आज आंध्रप्रदेश बंदची हाक पक्षाकडून देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्राबाबू नायडू हे सध्या आंध्रप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या त्यांची रवानगी राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. चंद्राबाबूंच्या अटकेपासूनच टीडीपी आक्रमक झाला असून अटकेच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी सीआयडीने नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (10 सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आलं, तिथे त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली.नायडू यांच्या अटकेनंतर, TDP नेत्यांनी चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम विधानसभा मतदारसंघात निषेध केला. नायडू यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी त्यांनी उपोषणही केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टीडीपीचे झेंडे घेऊन रॅली काढली, रस्ते अडवले आणि उपोषणाला बसले.
जनसेना पक्षाचे (जेएसपी) नेते पवन कल्याण यांनी,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी तुरुंगात गेले आहेत, त्यामुळे त्यांना इतर सर्वांनाही तुरुंगात पाहायचे आहे. ते म्हणाले, आम्ही जीव देऊ पण राज्याचे रक्षण करू असे म्हटले.
दरम्यान, कथित कौशल विकास महामंडळ घोटाळ्यात आंध्र प्रदेश पोलिसांनी नायडू यांचे ‘मुख्य सूत्रधार’ म्हणून वर्णन केलं होतं. या कथित घोटाळ्यामुळे राज्य सरकारचे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.




