हृदयद्रावक…! जेसीबीच्या धडकेत सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; पिंपरी-चिंचवड येथील घटना

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील -जेसीबीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास गोडाऊन चौक, मोशी येथे घडली आहे. ऋषिकेश जयदेव खराडे (वय ६, रा. मोशी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
या अपघातामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि रक्तस्राव झाल्यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत त्याच्या ३८ वर्षीय मावशीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल श्रीरामचंद्र यादव (वय २६, रा. मोहननगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या बहिणीचा सहा वर्षीय मुलगा ऋषिकेश हा गोडाऊन चौक, मोशी येथे भाजी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या जेसीबीने ऋषिकेश याला जोरात धडक दिली. या धडकेमुळे ऋषिकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी -चिंचवड शहरातील मोशी गोडाऊन चौक परिसरात ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या बहिणीचा सहा वर्षीय मुलगा ऋषिकेश हा गोडाऊन चौक, मोशी येथे भाजी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या जेसीबीने ऋषिकेश याला जोरात धडक दिली. या धडकेमुळे ऋषिकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेशने जागीच प्राण सोडले. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
ऋषिकेशला घरच्यांनी कोथिंबीर आणण्यासाठी सांगितले होते. कोथिंबीर आणायला गेले असता त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. मृत ऋषिकेशच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल रामचंद्र जाधवच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाला अटक केली आहे.





