पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी आढळले सहा पॉझिटिव्ह
Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात आज एकाच दिवशी सहा करोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या सध्या नऊ झाली आहे. त्यातील चारजण सहा महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल आहेत. तर एकजण पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असून सध्या तो पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर एकजण पिंपरीतील डी वाय पाटील रुग्णालयात उपचार घेत असून तो खडकी परिसरातील राहणारा आहे.
त्यांचे तपासणी अहवाल नुकतेच आले असून ते पॉझिटिव्ह आहेत . त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णाची संख्या सध्या नऊ झाली आहे. आज लागण झालेले करोना बाधित रुग्ण हे निजामुद्दीन येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. तर शहरातील आत्ता पर्यंत एकूण करोना बाधित रूग्णांची २१ झाली आहे. त्यापैकी १२ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.
टॅग्स:





