सियाचीनमध्ये हिमस्खलनात चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली : सियाचीनमध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या हिस्खलनात गस्त घालणारे लष्कराचे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
सियाचीनच्या उत्तरेकडील भागात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला हिमस्खलन झाले आहे. हे ठिकाण 18 हजार फूट उंचीवर आहे. डोग्रा रेजिमेंटचे सहा जवान आणि दोन हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यातील चार जवान आणि दोन हमालांचा मृत्यू झाला.
सैनिकांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. सियाचीन ही जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. शत्रूपेक्षाही येथे जवानांचा सामना वातावरणाशी असतो. हिवाळ्यात सियाचीनमध्ये हिमस्खलन होण्याचे प्रकार होत असून तेथील तापमान उणे 60 अंश सेल्सिअसपर्यंतही जाते.




