Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये 2 बॉम्बस्फोटात 6 ठार तर 7 जण जखमी

इस्लामाबाद :– उत्तर अफगाणिस्तानात एका बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 6 जण ठार झाले आहेत आणि 7 जण जखमी झाले आहेत. बाख प्रांतीय राजधानी मझार ए शरीफ शहरामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याचे तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद आसिफ वझिरी याने सांगितले.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनामध्ये हा बॉम्ब बसवण्यात आला होता. या बसमधून हियारतन गॅस ऍन्ड पेट्रोलियम डिपार्टमेंटची ही बस कर्मचाऱ्यांना घेत होती, तेंव्हा या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला, असे या प्रवक्त्याने सांगितले.
याशिवाय पूर्वेकडील नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबादमध्ये चलन विनिमय केंद्राजवळ झालेल्या आणखीन एका स्फोटात अन्य 6 जण जखमी झाले, असेही तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले.
#RussiaUkraineWar : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यापुढे रशियाची हवाई संरक्षण व्यवस्था निष्प्रभ
हा बॉम्ब बाजारपेठेमध्ये पेरण्यात आला होता. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही बॉम्स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्विकारलेली नाही. मात्र तालिबानचा प्रतिस्पर्धी असलेल्या इस्लामिक स्टेट खोरसान या गटाने हे बॉम्बस्फोट घडवले असण्याची शक्यता आहे.



