‘सितारे जमीन पर’चा दमदार ट्रेलर रिलीज; आमिर खान दिसणार नव्या भूमिकेत

Sitaare Zameen Par | बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सीक्वल आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आमिर खान आपल्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटासह 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा तीच जादू प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.
‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर आपलेपणा आणि आनंदाने भरलेला आहे. यात प्रेम, हास्य आणि भावनिक क्षणांचा अचूक समतोल आहे. या हृदयस्पर्शी विनोदी चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत, जे हसवण्याबरोबरच हृदयाला स्पर्श करतात. ट्रेलरमध्ये आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे.
‘सितारे जमीन पर’च्या ट्रेलरला एक हटके कॅप्शन देत, “1 टिंगू बास्केटबॉल प्रशिक्षक, 10 तुफानी सितारे आणि त्यांचा प्रवास…” असे लिहिले आहे. या चित्रपटाची टॅगलाईन “सबका अपना अपना नॉर्मल” अशी आहे. जो सर्वांना स्वीकारण्याचा आणि समावेशकतेचा संदेश देते.
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी ‘शुभ मंगल सावधान’ सारखा उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे. ‘सितारे जमीन पर’ हे त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठे प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आमिर खान पुन्हा एकदा आपल्या दमदार अंदाजात दिसणार आहे. Sitaare Zameen Par |
‘सितारे जमीन पर’ चे निर्मिती आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली झाले आहे, जो भारतातील सर्वात यशस्वी प्रोडक्शन हाऊसपैकी एक आहे. या बॅनरने ‘लापता लेडीज’, ‘दंगल’, ‘तारे जमीन पर’, ‘सीक्रेट सुपरस्टार’, ‘लगान’ यांसारखे अनेक उत्कृष्ट आणि अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत.
आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जिनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर या नव्या कलाकारांचाही समावेश आहे. आर.एस. प्रसन्ना यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 20 जून 2025 रोजी सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. Sitaare Zameen Par |
हेही वाचा:





