SIR Campaign: पावसाचा फटका आणि नागरिकांची गर्दी! ‘एस.आय.आर.’ अभियानाला मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारखा
SIR Campaign: मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश; सुधारित वेळापत्रकानुसार प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन.

SIR Campaign – सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (एस.आय.आर) साठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून या अभियानाला वेग आला आहे. नागरिकांची वाढती संख्या आणि येणाऱ्या अडचणी पाहता याला मुदतवाढ देण्यात आल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून मतदार नोंदणी व पडताळणी केंद्रांवर मोठी गर्दी होत असताना, मुदतवाढीमुळे नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार ३० जून ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बी.एल. ओ ) गृहभेटी घेण्यात येणार आहेत. ८ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण केली जाणार आहे. यानंतर १७ ऑगस्ट २०२५ रोजी मतदार यादीचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येईल. १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
तसेच १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नोटीस, सुनावणी आणि दावे-हरकतींचा निपटारा केला जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना सुधारित कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून,
नागरिकांनीही मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा आवश्यक हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. ) २०२५ कार्यक्रमाच्या सुधारित वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. कोकण, मुंबई व इतर काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गणना प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने राज्य शासनाने आयोगाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार ३० जून ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बी. एल.ओ) गृहभेटी घेण्यात येणार आहेत. ८ ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण केली जाणार आहे. यानंतर १७ ऑगस्ट २०२५ रोजी मतदार यादीचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येईल. १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नोटीस, सुनावणी आणि दावे-हरकतींचा निपटारा केला जाईल.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना सुधारित कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनीही मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा आवश्यक हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.





