Jairam Ramesh : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे विनाशकारी अस्त्र; जयराम रमेश यांची टीका
काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील मतदार याद्यांच्या बाबतीत ज्ञानेश कुमार हे पूर्णपणे विनाशकारी अस्त्र ठरले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Jairam Ramesh : काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील मतदार याद्यांच्या बाबतीत ज्ञानेश कुमार हे पूर्णपणे विनाशकारी अस्त्र ठरले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्ष संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले. विरोधी पक्षांतील ११ पक्षांच्या ७३ राज्यसभा खासदारांनी २४ एप्रिल २०२६ रोजी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी राज्यसभेच्या सरचिटणीसांकडे एक नवीन नोटीस सादर केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या गैरवर्तणुकीचे आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीतील पक्षपाती भूमिकेचे ९ स्पष्ट आरोप या नोटीसमध्ये लावण्यात आले आहेत. निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेवर ज्येष्ठ सनदी अधिकारी आर. एस. शर्मा आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनीही टीका केली आहे.
या प्रक्रियेमुळे मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असून लोकशाहीचे नुकसान होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ज्ञानेश कुमार हे स्वतः काहीही न करता केवळ गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून काम करत आहेत, असा थेट आरोप जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केला आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत नोटीस सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारच्या नोटिसा फेटाळल्या होत्या. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि डाव्या पक्षांसह सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या खासदारांनी या मागणीवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.






