Rahul Deshpande Divorce : १७ वर्षांनंतर गायक राहुल देशपांडे पत्नीपासून विभक्त; पोस्टद्वारे घटस्फोट घेतल्याची दिली माहिती, चाहत्यांना धक्का!

Rahul Deshpande Divorce : सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या इंन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक म्हणून राहुल देशपांडे यांची ओळख आहे. त्यांना गायनाचे स्वर त्यांच्या घरातूनच उमगले. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत, त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.
पण त्यांनी त्यांच्या इंन्स्टाग्रावरूव एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लग्नाच्या १७ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांची पत्नी नेहासोबत विभक्त झाल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये राहुल देशपांडे यांनी घटस्फोटानंतर लेकीचा सांभाळ करेन आणि तिचं पालकत्व स्वीकारेन असं देखील या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा निर्णय त्यांची पत्नी नेहा आणि त्यांनी स्वतः घेतला असल्याचे इंन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितलं आहे.
” प्रिय मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या आयुष्याच्या प्रवासात आपापल्या परीने एक महत्त्वाचा भाग निभावला आहे आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाचे अपडेट शेअर करायची आहे. तुमच्यापैकी काही जणांना मी ही बातमी आधीच सांगितली आहे.” असं पोस्टमध्ये राहुल देशपांडे यांनी सांगितलं आहे.
१७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आणि अगणित सुंदर आठवणींनंतर, मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आपापले आयुष्य स्वतंत्रपणे पुढे जगत आहोत. आमचं कायदेशीर वेगळं होणं सप्टेंबर २०२४ मध्ये कायदेशीररित्या पूर्ण झालं आहे, असं देखील म्हटलं आहे.
View this post on Instagram
राहुल यांनी या पोस्टमध्ये त्यांची मुलगी रेणुका हिचा उल्लेख करत विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे, असं म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, हा जरी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असला तरी, पालक म्हणून असलेले आमचे नाते आणि एकमेकांबद्दल असलेला आदर आजही मजबूत आहे. या काळात तुम्ही दाखवलेल्या समजुतीबद्दल आणि आणि निर्णयाचा आदर कराल अशी आशा आहे, अशी पोस्ट राहुल देशपांडे यांनी त्यांच्या इंन्स्टाग्रावरून शेअर केली आहे. या पोस्टवरून त्यांच्या चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.





