“कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना…”; महेश कोठारेंच्या ‘त्या’ विधानाला मराठी अभिनेत्रीचा फुल सपोर्ट

megha dhade : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त असल्याचे विधान केले होते. या विधानावरून राजकीय खल सुरू झाला आहे. एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते. यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी “तुमचे सिनेमे फक्त भाजपचे लोकं पाहत नाहीत, असे म्हणत असे बोलाल तर तात्या विंचू चावेल तुम्हाला”, या शब्दांत टीका केली होती. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने महेश कोठारेंच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री मेघा धाडे हिने सोशल मीडियावर पोस्ट करत महेश कोठारे यांच्या विधानावरून सुरू झालेल्या गदारोळावर भाष्य केले आहे. या पोस्टमधून अभिनेत्रीने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं, जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं, आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना, असे म्हणत टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.
पोस्टमधून काय म्हणाली अभिनेत्री?
यासोबतच अभिनेत्रीने पोस्टमधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता! सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही! परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली!”
काय म्हणाले होते महेश कोठारे ?
“भाजपा म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल”
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा लाडक्या बहिणीला फोन; भाऊबीजेच्या शुभेच्छा देत म्हणाले “एवढी खंबीर बहीण मिळायला भाग्य लागतं…”





