मराठी इंडस्ट्रीतील अभिनेता निवडणूक लढवणार? ‘त्या’ पोस्टमुळे थेट संकेत म्हणाला “आता काहीतरी…”

उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत, अशा इच्छुकांमध्ये काहींना संधी तर काहींना उमेदावारीपासून दूर राहावे लागणार आहे. या सगळ्यात निवडणुकीच्या रिंगणात काही कलाकार मंडळी देखील इच्छुक आहेत. नुकतेच एका प्रसिद्ध अभिनेत्याने इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता तेजपाल वाघ याने इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून अभिनेत्याने निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. आजवर मला वाईने, वाईकरांनी भरपूर प्रेम दिलं.. आता आपल्या वाईसाठी काहीतरी करायची वेळ आली आहे, अशा आशयाची पोस्ट तेजापाने इंन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये अभिनेत्याने वाई शहरात अनेक समस्या आहेत ज्या सामान्य वाईकर नागरिकाला रोज भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी आपल्यालाच वाई नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. हा आपला वाईकर नागरिकांचा लढा आहे आणि तो आपण एकत्र मिळून लढूया..! ही लढाई कोणत्याही राजकीय नेतृत्वाच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर ही आपल्या प्रश्नांच्या, अडचणींच्या विरोधात आहे. हा लढा आपण एकत्र मिळून लढूया आणि आपल्या वाईला घडवूया..!! आपलाच – तेजपाल जयंत वाघ. असे त्याने पुढे पोस्टमध्ये म्हटले आहे.
अभिनेता तेजपाल वाघ याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने काही मराठी सिनेमांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. त्याचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावतीने सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रमुख पद देण्यात आहे. याविषयी त्याने व्हिडीओ शेअर आभार मानले होते. आता त्याने केलेल्या पोस्टेमुळे तो निवडणुकीच्या रिंगाणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : “दोन वर्षे लागली…” ; मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदारांनी सांगितली पंतप्रधानांना टीम इंडियाच्या विजयाची कहाणी





