आपल्या मनमोहक आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनात जागा करणारी गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. नुकतीच नेहा कक्कर आणि तिचा नवरा रोहनप्रीत सिंह यांना धमकी देण्यात आली आहे. नेहा कक्करने तिच्या नवऱ्याला पडद्याआड ठेवावे. असा इशारा निहंग मानसिंग अकाली यांनी दिला आहे. “सोशल मीडियावर चुकीचा चुकीचा व्हिडीओ पसरवणाऱ्यांना आधी प्रेमाने समजावून सांगितले जाईल आणि नंतर धडा शिकवला जाईल. यासाठी तुरुंगात जावे लागले तरी चालेल परंतु समाजात कोणत्याही प्रकारची घाण पसरू देणार नाही.” अशी धमकी देण्यात आली आहे. नेहाने आपल्या पतीला पडद्यामागेच ठेवावे. तुम्ही लोकांनी पंजाबचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. थोडी तरी लाज बाळगा. तुम्ही लोक फिल्म स्टार आणि चांगले गायक आहात, तर काही चांगले काम करा आणि तुमचे विचारही चांगले ठेवा. तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार? असेदेखील निहंग मानसिंग अकाली म्हणाला आहे.