Janhvi Kapoor : सिंपल लुक पण दिसते क्यूट! जान्हवी कपूरचा TIFF च्या रेड कार्पेटवर रँम वाक; चाहत्यांसोबत काढला सेल्फी

Janhvi Kapoor : नुकताच होमबाउंड या सिनेमाचा प्रीमिअर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पार पडला. या दरम्यान अभिनेत्री जान्हवी कपूरचा लूक आता सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
कान्स चित्रपट महोत्सवानंतर जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूरने चाहत्यांशी संवाद साधला. त्यांना ऑटोग्राफ दिले आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. या प्रीमिअरला दिग्दर्शक नीरज घेयवान देखील उपस्थित होता.
‘होमबाउंड’च्या प्रीमियर दरम्यान चित्रपटातील संपूर्ण कलाकारांनी रेड कार्पेटवर रँम वॅाक केला. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने वेअर केलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी जान्हवीने रेड कार्पेटवर पोज देखील दिली. तसेच तिने चाहत्यांसोबत सेल्फीही काढले आणि त्यांना ऑटोग्राफही दिले. ‘होमबाउंड’ हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवडल्यापासून या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती तिच्या आगामी ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन, सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शशांक खेतान दिग्दर्शित हा चित्रपट २ ऑक्टोबर या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : “९/११ मध्ये अमेरिकेने जे केले तेच आम्ही केले” ; दोहा हल्ल्यावर नेतन्याहू यांचे मोठे विधान





