जबरी फॅन..! शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी कंन्टेट क्रिऐटरची थडपड; तो व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा नेमकं काय घडलं?

Shah Rukh Khan fan : सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना समक्ष भेटण्याची अनेकांची इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते तर काहींना वाट पाहावी लागते. बॅालीवूडमधील स्टार कलाकार शाहरुख खानचे चाहतावर्ग मोठा आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. अशाचा एका जबरी फॅनची त्याची पहिली झलक अगदी जवळून पाहायला मिळाली आहे. या चाहतीने एक व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती देत आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
अभिनेता शाहरुख खानने ‘मेट गाला’ २०२५ साठी न्यू यॉर्कमध्ये हजेरी लावली होती. एका पाकिस्तानी चाहतीने त्याच्या हॉटेलबाहेरचा व्हिडिओ शेअर केला आहे. आपली बालपणीची इच्छा पूर्ण झाली आहे असे या चाहतीने म्हटले आहे. मेट गालाला बॅालीवूडमधील कियारा अडवाणी, सिद्धार्थ म्हण्लात्रा या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.
सेहरिश नावाची एक कंटेंट क्रिएटर न्यू यॉर्कमध्ये राहते. पण ती मूळची पाकिस्तानची आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. सेहरिशने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी त्याला शोधले, तो खूप छान दिसत होता.’ माझ्या आतलं बाळ खूप आनंदी आहे. सेहरिशचा व्हिडिओ ‘माझ्यासोबत चला, न्यू यॉर्कमध्ये शाहरुख खानला शोधूया’ या कॅप्शनने सुरू होतो.
View this post on Instagram
सेहरिशने न्यू यॉर्कमधील एका हॅाटेलबाहेर हा व्हिडिओ शूट केला आहे. येथे शाहरुख आणि इतर कलाकारांची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर तिने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, माझ्या आयुष्याचा प्रेम, माझ्या आयुष्याचा प्रकाश, माझे संपूर्ण हृदय- किंग खान. सेहरिशच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.





