कान्सच्या रेड कार्पेटवरून ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, सिमी ग्रेवाल यांचा वॅाक; प्रेक्षकांची टाळ्या वाजवून दाद…

Sharmila Tagore And Simi Garewal : फ्रान्समध्ये ७८ वा कान्स फिल्म फेस्टीव्हल मोठ्या दिमाखात सुरू आहे, या फेस्टीव्हलला हॅालीवूडसोबत बॅालीवडूमधील कलाकार देखील हजेरी लावत आहे. फेस्टीव्हच्या सातव्या दिवशी अरण्यार दिन रात्री या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टगोर आणि सिमी ग्रेवाल यांनी हजेरी लावली. दोघींनीही कान्सच्या रेड कार्टेपवरून वॅाक केले.
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५’ चा रेड कार्पेट स्टार्सनी सजलेला आहे. फिस्टिव्हलच्या सातव्या दिवशी देखील अनेक स्टार्संनी रेड कार्पेटवरून वॅाक केले. अभिनेत्री शर्मिला टगोर आणि सिमी ग्रेवाल यांनीही रेड कार्पेटवरून वॅाक केले. दोघीनींही ‘अरण्यार दिन रात्री’ च्या खास प्रीमियरसाठी सुंदर ड्रेस परिधान केले होते. यावेळी त्यांनी पोझही दिल्या. शर्मिला टागोरने एक आकर्षक हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती, तर सिमी ग्रेवालने आयव्हरी ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला. या
यावेळी शर्मिला टागोर यांची मुलगी सबा पतौडी देखील उपस्थित होती. विशेष म्हणजे, कान्समध्ये सिमी ग्रेवालचा हा पहिलाच परफॉर्मन्स होता. चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचा ‘अरण्यार दिन रात्री’ हा चित्रपट अमेरिकन चित्रपट निर्माते वेस अँडरसन यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षांच्या कालावधीत रिमेक करण्यात आला. चित्रपटाला जतन करून ठेवण्यासाठीची सुरूवात २०१९ मध्ये करण्यात आली.
मार्टिन स्कॉर्सेसच्या द फिल्म फाउंडेशनच्या बोर्डवरील त्यांच्या पदाद्वारे, अँडरसनने चित्रपट जतन करण्याबद्दल चर्चा सुरू केल्यापासून याची सुरुवात झाली. सत्यजित रे यांच्या कामाबद्दल दिग्दर्शकाच्या आवडीमुळे द फिल्म फाउंडेशनचा वर्ल्ड सिनेमा प्रोजेक्ट, फिल्म हेरिटेज फाउंडेशन, जानस फिल्म्स आणि द क्रायटेरियन कलेक्शन यांच्यात गोल्डन ग्लोब फाउंडेशनच्या निधीसह सहयोगी प्रयत्न करण्यात आले.
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ हा १३ मेपासून फॅान्समध्ये सुरू असून यंदाचं कान्सचे ७८ वे वर्ष आहे. गेल्या सहा दिवसांत अनेक भारतीय स्टार्सनी रेड कार्पेटवर हजेरी लावत कान्सची शोभा वाढवली आहे. हा चित्रपट महोत्सव २४ मेपर्यंत सुरू राहणार आहे.





