Gold-Silver Todays Rate: सोन्या-चांदीत मोठी घसरण; चांदी तब्बल 21,600 रुपयांनी स्वस्त
Gold-Silver Todays Rate: अखिल भारतीय सराफा संघटनेनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 1,66,000 रुपयांवरून घसरून 1,62,800 रुपये प्रति 10 ग्रॅम (करांसह) झाला. चांदीचा दरही मागील सत्रातील 2,96,600 रुपयांवरून घसरत 2,75,000 रुपये प्रतिकिलोवर आला.

Gold-Silver Todays Rate: आज शुक्रवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. चांदीच्या दरात तब्बल 21,600 रुपयांची घसरण होऊन ती 2.75 लाख रुपये प्रतिकिलोवर आली, तर सोन्याचा भाव 3,200 रुपयांनी कमी होऊन 1.62 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
अखिल भारतीय सराफा संघटनेनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 1,66,000 रुपयांवरून घसरून 1,62,800 रुपये प्रति 10 ग्रॅम (करांसह) झाला. चांदीचा दरही मागील सत्रातील 2,96,600 रुपयांवरून घसरत 2,75,000 रुपये प्रतिकिलोवर आला.
हेही वाचा – डॉलरसमोर रुपया प्रथमच 96.14 वर; विक्रमी घसरणीने बाजारात चिंता
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, वाढती महागाई, ऊर्जा दरातील तेजी आणि अमेरिका-इराण तणावामुळे पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे गुंतवणूकदार डॉलर आणि अमेरिकी बाँड्सकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याची आकर्षकता कमी झाली.
हेही वाचा – ‘या’ कारणांमुळे शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांचे 1.67 लाख कोटी रुपयांचे नुकसान
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 104 डॉलरने घसरून 4,548.46 डॉलर प्रति औंसवर आले, तर चांदी 5.26 डॉलरने घसरून 78.21 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी नफावसुली आणि डॉलर निर्देशांकातील मजबुतीमुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढल्याचे सांगितले.





