Gold-Silver Prices: इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात मोठी झेप; सोने १,६२,८०० तर चांदी २,७२,००० रुपयांवर
Gold-Silver Prices : सोने आणि चांदीमध्ये जगभरातील गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत.

Gold-Silver Prices: इराण व अमेरिकेत दरम्यान संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीमध्ये जगभरातील गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत. दिल्ली सराफात चांदीचा दर 8 हजार रुपयांनी म्हणजे तीन टक्क्यांनी वाढून 2 लाख 72 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सोन्याचा दर 3 हजार 300 रुपयांनी म्हणजे 2.06 टक्क्यांनी वाढून 1 लाख 62 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले शुल्क घटनाबाह्य असल्याचे सांगितल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे.
या घडामोडीचा जागतिक व्यापारावर परिणाम होणार असल्यामुळे विविध मालमत्ता दरम्यानच्या गुंतवणुकीत फेरफार वेगाने होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले. जागतिक बाजारात चांदीचा दर दोन टक्क्यांनी वाढून 86.50 डॉलर व सोन्याचा दर एक टक्क्याने वाढून 5,151 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. रिझर्व बँकांकडून सोन्याची खरेदी चालूच असल्यामुळे सोन्याच्या दारात वाढत होत असल्याचे दिसून येते.




