Sikkim Flood : सिक्कीमच्या पुरात आतापर्यंत 18 ठार, 98 बेपत्ता; एनडीआरएफकडून बचावकार्य राबवण्यात येणार

Sikkim Flood : सिक्कीममध्ये मंगळवारी रात्री अचानक झालेल्या ढगफुटीमुले राज्यात भीषण पूर आला आहे. ज्यामुळे याठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पुरामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 98 लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहेत.
राज्य सरकारने केंद्र सरकारला राज्यातील परिस्थितीची माहिती दिली आणि त्यानुसार आज राष्ट्रीय आपत्ती दल (एनडीआरएफ) ची एक टीम सिक्कीममध्ये दाखल झाली सलून बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही टीम उत्तर सिक्कीममधील चुंगथांग येथे जाणार आहे. या ठिकाणी लोकांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागत आहे कारण इथे लोक अन्न, पाणी किंवा कोणत्याही सुवेधेशिवाय मागच्या 48 तासांपासून बोगद्यात अडकले आहेत. दरम्यानन, बोगद्यात अडकलेले लोक जिवंत आहेत की नाही हे कोणालाच माहिती नाही.
The Department of Military Affairs is coordinating the rescue and relief operations being carried out by the military personnel in the flash flood-affected areas of Sikkim. Military and civilian officials also working towards restoring connectivity of roads and communication to… https://t.co/ackHKFuVGU
— ANI (@ANI) October 6, 2023
सिक्कीमचे मुख्य सचिव विजय भूषण पाठक म्हणाले, “चेक पोस्टवर उपलब्ध आकडेवारीनुसार, लाचेन आणि लाचुंगमध्ये सुमारे 3000 लोक अडकले आहेत. 700-800 ड्रायव्हर तेथे अडकले आहेत. मोटारसायकलवर गेलेले 3150 लोकही तेथे अडकले आहेत.” आम्ही लष्कर आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सर्वांना बाहेर काढू. लष्कराने लाचेन आणि लाचुंगमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी इंटरनेटवर बोलायला लावले.” अशी माहिती त्यांनी दिली.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, एनडीआरएफ टीमसाठी बोगद्यातून अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान असणार आहे. या टीममध्ये लँड रेस्क्यूर्स आणि स्कूबा डायव्हर्सचा समावेश असेल. त्यांच्याकडे हॅमर, वॉटर गन, रॉक कटर, सॅटेलाइट फोन, जनरेटर सेट आणि वैद्यकीय उपकरणे असतील.
बुधवारी आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे चुंगथांग शहराचा सिक्कीमच्या उर्वरित भागापासून संपर्क तुटला आहे. पॉवर लाइन्स खाली पडल्या, सेल टॉवर नष्ट झाले, पूल नष्ट झाले आणि रस्ते वाहून गेले. कनेक्टिव्हिटी नसल्याने अडकलेल्या लोकांची माहिती नाही. तेहे सर्व तिस्ता-III धरणाचे व्यवस्थापन करणार्या राज्य सरकारच्या कंपनीत काम करतात एवढेच आतापर्यंत माहीत आहे. सर्व बोगदे तीस्ता-III धरण संकुलात आहेत, जे गुरुवारच्या पुरात उद्ध्वस्त झाले होते.




