विजयानंतर सिध्दार्थ शिरोळेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे: शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे सिध्दार्थ शिरोळे हे कॉंग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा पराभव करून विजयी झाले आहेत. शिरोळे विजयी झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिरोळे म्हणाले की, मी हिंजवडी मेट्रो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयन्त करणार आहे. याबरोबरच मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वस शिरोळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, इतकी चुरशीची निवडणूक होईल, अशी अपेक्षा नव्हती. विजयी झाल्याने आनंद होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे.
यावेळी पत्रकारांनी त्यांना घराणेशाही बद्दल विचारले, त्यावेळी इथे घराणेशाहीचा संबंध नाही. मी 2011 पासून पक्षात सक्रिय आहे. नगरसेवक, पीएमपीएलचा संचालक म्हणून कार्यरत आहे, त्यानंतर पक्षाने मला उमेदवारी दिली असल्याचे शिरोळेंनी स्पष्ट केलं आहे.





